Life is good

… really really good :)

Namanjur by Sandeep Khare November 5, 2008

Filed under: marathi — Blogger @ 1:08 pm
Tags: , , , , , ,

जपत किनारा शीड सोडणे नामंजूर
अन् वार्‍याची वाट पहाणे नामजूर
मी ठरवावी दिशा वाहत्या पाण्याची
येईल त्या लाटेवर डूलणे नामंजूर

 

मला ऋतूंची साथ नको अन् कौल नको
मला कोठल्या शुभ शकुंनाची झूल नको
मुहूर्त माझा तोच ज्या क्षणी हो ईछा
वेळ पाहूनी खेळ मांडणे नामंजूर

 

माझ्या हाती विनाश माझा कारण मी
मोहासाठी देह ठेवतो तारण मी
सुंदरतेवर होवो जगणे चक्काचूर
मज अब्रूचे थिटे पहाणे नामंजूर

 

रूसवे फुगवे भांडण तंटे लाख कळा
आपला तुपला हिशोब आहे हा सगळा
रोख पावती इथेच ध्यावी अन् घ्यावी
गगनाशी नेणे गार्‍हाणे नामंजूर

 

मी मनस्वितेला शाप मानले नाही
अन् उपभोगला पाप मानले नाही
ढग काळा ज्यातुन एकही फिरला नाही
नभ असले मी अद्याप पाहिले नाही

 

नीती तत्वे फसवी गणीते दूर बरी
रक्ततील आदिम जगण्याची ओढ खरी
जगण्यासाठी रक्त वाहणे मज समजे
पण रक्ताचा गर्व वाहणे नामंजूर

 

Mi hajaar chintanni by Sandeep Khare October 20, 2008



मी हजार चिंतानी हे डोके खाजवतो
तो कट्यावर बसतो घुमतो शीळ वाजवतो

मी जुनाट दारापरी किरकिरा बंदी
तो सताड उघड्या खिडकीपरी स्वछन्दी
मी बीजागरींशी जीव गंजवित बसतो
तो लन्घुन चौकट पार निघाया बघतो

डोळ्यात माझिया सूर्याहून संताप
दिसतात त्वचेवर राप उन्हाचे शाप
तो त्याच उन्हाचे झगझगीत लखलखते
घडवून दागिने सूर्यफुलांवर झुलतो

मी पायी रुतल्या काचंवरती चिडतो
तो त्याच घेऊनी नक्षी मांडून बसतो
मी डाव रडीचा हात जिंकतो अंती
तो स्वच्छ मोकळ्या मुक्त मनाने हरतो

मी आस्तिक मोजत पुण्याईची खोली
नवसांची ठेऊन लाच लावतो बोली
तो मुळात येतो इच्छा अर्पुन सार्‍या
अन् धन्यवाद देवाचे घेऊन जातो

मज अध्यात्माचा रोज नवा शृंगार
लपतो न परी चेहेरा आत भेसूर
तो फक्त ओढतो शाल नभाची तरीही
त्या शामनिळ्याच्या मोरपिसा परी दिसतो

 

Mi morcha nela nahi by Sandeep Khare October 17, 2008


मी मोर्चा नेला नाही, मे संपही केला नाही
मी निषेध सुद्धा साधा कधी नोंदवलेल नाही ..

भवताली संगर चाले, तो विसफारून बघताना
कुणी पोटातून चिडताना, कुणी रक्ताळून लढताना
मी दगड होऊनी थिजलो रस्त्याच्या बाजूस जेव्हा
तो मारायाला देखील मज कुणी उचलले नाही

नेमस्त झाड मी आहे, मूळ फांद्या जिथल्या तेथे
पावसात हिरवा झालो, थंडीत झाडली पाने
पण पोटातून कुठलीही खजिन्याची ढोली नाही
कुणी शस्त्र लपवले नाही, कधी गरूड बैसला नाही

मज जन्म फळाचा मिळता, मी केळे झालो असतो
मी असतो जर का भाजी, तर भेंडी झालो असतो
मज चिरता चिरता कोणी रडले वा हसले नाही
मी कांदा झालो नाही, आंबा ही झालो नाही

मी मोर्चा नेला नाही, मे संप ही केला नाही
मी निषेध सुद्धा साधा कधी नोंदवलेल नाही ..

 

 
Follow

Get every new post delivered to your Inbox.